Jump to content

मराठी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा मराठी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://mr.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण मे १, इ.स. २००३
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या १,०४,०४४ लेख आहेत. "शिवाजी महाराज" व "बाबासाहेब आंबेडकर" हे मराठी विकिपीडियावरील आजवरचे सर्वाधिक वाचले जाणारे पहिले दोन लेख आहेत. "औदुंबर (कविता)" आणि "वसंत पंचमी" हे मराठी विकिपीडियावर लिहिले गेलेले अनुक्रमे पहिले व दुसरे लेख आहेत.

प्रगती

मराठी विकिपीडियाची प्रगती खालीलप्रमाणे झालेली आहे.[१]

टप्पातारीखमागील टप्प्यापासून कालावधी
सुरुवात१ मे २००३—
२०,००० लेख पूर्ण२२ सप्टेंबर २००८1971 दिवस
३०,००० लेख पूर्ण२ जुलै २०१०648 दिवस
४०,००० लेख पूर्ण२७ फेब्रुवारी २०१४1336 दिवस
५०,००० लेख पूर्ण२२ डिसेंबर २०१७1394 दिवस
६०,००० लेख पूर्ण२१ ऑगस्ट २०२०973 दिवस
७०,००० लेख पूर्ण
८०,००० लेख पूर्ण२३ सप्टेंबर २०२१
९०,००० लेख पूर्ण१२ फेब्रुवारी २०२३507 दिवस
१,००,००० लेख पूर्ण२४ जुलै २०२५893 दिवस

सदस्य आणि संपादक

आज, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६, शुक्रवार रोजी
मराठी विकिपीडियाची सांख्यिकी - सद्यस्थिती
एकूण सदस्यखातेएकूण लेखएकूण संचिका/चित्रेप्रचालक
१,८६,५६८१,०४,०४४२,४००१०

टीका

दैनिक प्रहारचे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहला; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे.[२]

ताम्हणे लिहीतात की तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणे, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच, कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, असे विकिपीडियातही दिसते.[२] येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.[२] संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ↑ "Wikipedia Statistics - Tables - Marathi". 20 February 2023 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी! Archived 2011-11-16 at the वेबॅक मशीन., ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनिटांनी पडताळली वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर १६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

बाह्य दुवे