प्रदीप रावत (अभिनेता)
Appearance
प्रदीप रावत
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| स्थानिक भाषेतील नाव | प्रदीप रावत |
| दिलेले नाव | Pradeep |
| आडनाव | Rawat |
| जन्म तारीख | १७ जून 1952 |
| जन्मस्थान | जबलपुर |
| मृत्यू तारीख | ४ ऑगस्ट 2026 |
| मृत्यूस्थान | मुंबई |
| मृत्युची पद्धत | नैसर्गिक कारणे |
| मृत्युचे कारण | hematologic cancer |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | हिंदी |
| व्यवसाय | अभिनेता |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1983 |
| कार्य कालावधी (अंत) | 2026 |
| पुरस्कार | Nandi Award for Best Villain, फिल्मफेर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार, SIIMA Award for Best Actor in a Negative Role – Telugu, Santosham Best Villain Award |
प्रदीप रावत (२१ जानेवारी, १९५२ - ४ ऑगस्ट, २०२६)[१] हे एक भारतीय अभिनेते होते, ज्यांनी प्रामुख्याने तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. प्रामुख्याने खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, रावत यांनी बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत अश्वत्थामा म्हणून पहिली भूमिका केली होती. रावत यांनी साय चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी गजनी (२००५) या चित्रपटात काम केले, जिथे ते दुहेरी भूमिकेत दिसले. त्यांनी या चित्रपटाची हिंदी पुनर्निर्मिती गजनी मध्ये देखील काम केले.[२] त्यांनी परोडी द्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत चायना टाउन द्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत; हिरो ४२० द्वारे बंगाली चित्रपटसृष्टीत आणि क्रॅक फायटर द्वारे भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
पुरस्कार
[संपादन]- २००४: विजेता, साय चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार (तेलगू)
- २००४: विजेता, साय चित्रपटासाठी संतोषम सर्वोत्तम खलनायक पुरस्कार
- २००४: विजेता, साय चित्रपटासाठी नंदी सर्वोत्तम खलनायक पुरस्कार
- २०१२: नामांकन - मंगला चित्रपटासाठी सायमा सर्वोत्तम नकारात्मक भूमिका अभिनेता पुरस्कार (तेलगू)
- २०१४: नामांकन - नायक चित्रपटासाठी सायमा सर्वोत्तम नकारात्मक भूमिका अभिनेता पुरस्कार (तेलगू)
संदर्भ
[संपादन]- ↑ "'गजनी' फेम प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". दैनिक लोकमत. ४ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Aamir Khan's 'Ghajini' co-star Pradeep Rawat recalls the actor getting injured during action scene: 'Heard him scream in pain' | - Times of India". timesofindia.indiatimes.com. 2025-08-24 रोजी पाहिले.